GT vs LSG, IPL 2023 Match 51 Live Score Update: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार कृणाल पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
गुजरातचे होम ग्राऊंड असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने 7 धावांनी विजय मिळवला होता.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 51वा सामना आज गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स (GT vs LSG) यांच्यात खेळला जात आहे. गुजरातचे होम ग्राऊंड असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने 7 धावांनी विजय मिळवला होता. त्याचवेळी लखनौला गुजरात टायटन्सला आपल्या घरच्या मैदानावर पराभूत करून पराभवाचा बदला घ्यायचा आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार कृणाल पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.
लखनौ सुपर जायंट्स : क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, दीपक हुडा, करण शर्मा, कृणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, स्वप्नील सिंग, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान.