Mumbaicha Raja Rohit Sharma: चाहत्यांकडून हार्दिक पांड्यासमोर ‘मुंबई चा राजा रोहित शर्मा’च्या जोरदार घोषणा, व्हिडिओ होतोय व्हायरल; Fact Check

रोहित शर्माला (Rohit Sharma) हटवून हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्स संघाची कमान सोपवण्यात आली आहे. यावरुन चाहत्यांमध्ये मोठ्याप्रमाणे नाराजगी असुन सोशल मीडियावर हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्स टीका करताना दिसून येत आहे.

Hardik Pandya vs Rohit Sharma: हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आयपीएल 2023 (IPL 2023) मोसमात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात परतला आहे. यापूर्वी, तो गुजरात टायटन्सचा भाग होता, जिथे त्याने संघासाठी विजेतेपदही जिंकले होते. आता पुन्हा एकदा तो आपल्या जुन्या संघात परतला आहे आणि तो येताच त्याला कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित शर्माला (Rohit Sharma) हटवून हार्दिक पांड्याकडे संघाची कमान सोपवण्यात आली. यावरुन चाहत्यांमध्ये मोठ्याप्रमाणे नाराजगी असुन सोशल मीडियावर हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सवर टीका करताना दिसून येत आहे. संघाच्या या निर्णयावर चाहते सोशल मीडियावर सतत प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्यासमोर चाहते 'मुंबई चा राजा रोहित शर्मा'चा नारा देताना दिसत आहेत. कृपया लक्षात घ्या की हा जुना व्हिडिओ आहे. (हे देखील वाचा: Team India New Record: भारताने ऑस्ट्रेलियाचा 24 वर्ष जुना विक्रम मोडला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवताच रचला इतिहास)

पाहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement