TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: कृणाल पांड्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात सामील, मिळाले 5 करोड 75 लाख रुपये

TATA IPL 2025 Mega Auction Day 2: पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात.

Krunal Pandya (Photo Credit - Twitter)

TATA IPL 2025 Mega Auction Day 2: इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी खेळाडूंचा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे सुरू आहे. या मेगा लिलावाचा आज दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात. ऋषभ पंतने लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्व विक्रम मोडले, जिथे लखनौ सुपर जायंट्सने त्याच्यासाठी 27 कोटी रुपयांची बोली लावली. त्यांच्याशिवाय श्रेयस अय्यरवर 26.75 कोटी रुपये, तर व्यंकटेश अय्यरवर 23.75 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मेगा लिलावासाठी 577 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. दरम्यान, हार्दिक पंड्याचा भाऊ कृणाल पांड्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात सामील झाला आहे, जिथे त्याला 5.75 कोटी रुपये मिळाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement