Kolkata Knight Riders Win IPL 2024: कोलकाताने तिसऱ्यांदा जिंकले आयपीएल विजेतेपद, फायनलमध्ये हैदराबादला केले पराभूत

या सामन्यात कोलकाताने हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत आयपीएलच्या विजेतेपदावर तिसऱ्यांदा नाव कोरल आहे.

SRH vs KKR IPL 2024 Final: आयपीएल 2024 चा अंतिम सामना (IPL 2024 Final) आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला गेला. या सामन्यात कोलकाताने हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत आयपीएलच्या विजेतेपदावर तिसऱ्यांदा नाव कोरल आहे. तत्तपुर्वी, हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना हेदराबादने कोलकातासमोर 114 धावांचे माफक लक्ष्य ठेवले. सनरायझर्स हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 24 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 3 बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताने दोन विकेट गमावून विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्ससाठी स्टार फलंदाज व्यंकटेश अय्यरने नाबाद 52 धावांची शानदार खेळी केली. सनरायझर्स हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)