IPL 2024 Points Table: कोलकाताने बंगळुरूचा सात विकेट्स राखून केला पराभव, केकेआरने गुणतालिकेत घेतली मोठी झेप
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या (Virat Kohli) नाबाद 83 धावांच्या जोरावर 20 षटकांत 6 गडी गमावून 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्स संघाने दमदार सुरुवातीचा फायदा घेत 16.5 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 186 धावा करत सामना जिंकला.
KKR Beat RCB IPL 2024 10th Match: एमए चिदंबरम स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी राखून पराभव (KKR Beat RCB) केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या (Virat Kohli) नाबाद 83 धावांच्या जोरावर 20 षटकांत 6 गडी गमावून 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्स संघाने दमदार सुरुवातीचा फायदा घेत 16.5 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 186 धावा करत सामना जिंकला. 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी कोलकाता नाईट रायडर्सला चांगली सुरुवात करून दिली आहे. सुनील नरेन 22 चेंडूत 47 धावा करून बाद झाला तर फिलिप सॉल्ट 20 चेंडूत 30 धावा करून बाद झाला. व्यंकटेश अय्यर 30 चेंडूत 50 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार श्रेयस अय्यरने 24 चेंडूत 39 धावा केल्या. रिंकू 5 धावा करून नाबाद राहिली. या दमदार विजयानंतर केकेआरने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी मोठी झेप घेतली आहे. तर आरसीबी सहाव्या स्ठानावर आहे.
पाहा गुणतालिकेची स्थिती