Asia Cup 2023: सुपर फोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध केएल राहुलचे भारतीय संघात पुनरागमन, श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर
पहिल्या मुलाच्या जन्मामुळे भारताच्या नेपाळविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात न खेळलेला जसप्रीत बुमराह मोहम्मद शमीच्या जागी संघात परतला आहे. श्रेयसच्या जागी राहुलचे पुनरागमन झाले आहे.
पाठीच्या दुखण्यामुळे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आशिया चषकाच्या भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सुपर 4 सामन्यातून बाहेर पडला आहे. त्यामुळे केएल राहुलला (KL Rahul) भारतीय संघात प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली आहे. ज्याचे प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीच्या वेळी रोहित शर्माने भारतासाठी दोन बदलांची पुष्टी केली. पहिल्या मुलाच्या जन्मामुळे भारताच्या नेपाळविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात न खेळलेला जसप्रीत बुमराह मोहम्मद शमीच्या जागी संघात परतला आहे. श्रेयसच्या जागी राहुलचे पुनरागमन झाले आहे.
भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)