KKR vs CSK IPL 2021: रुतुराज-डु प्लेसिसने केकेआरची उडवली दाणादाण, सुपर किंग्सने उभारला 220 धावांचा डोंगर

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सुरु असलेल्या आयपीएलच्या 15व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) यांच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरोधात 220 धावांचा डोंगर उभारला आहे.

फाफ डु प्लेसिस (Photo Credit: Twitter/IPL)

KKR vs CSK IPL 2021: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सुरु असलेल्या आयपीएलच्या 15व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) यांच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरोधात 220 धावांचा डोंगर उभारला आहे. रुतुराजने 64 धावा केल्या आणि डु प्लेसिससोबत 115 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत सुरुवात करून दिली. मोईन अलीने 25 धावा तर कर्णधार एमएस धोनीने 17 धावांचे योगदान दिले. डु प्लेसिस 95 धावा आणि रवींद्र जडेजा 6 धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, केकेआरसाठी सुनील नारायण, आंद्रे रसेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement