Jhulan Goswami घेणार International Cricket मधून निवृत्ती, 'या' ऐतिहासिक मैदानावर खेळणार शेवटचा सामना

इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी झुलनची शुक्रवारी एकदिवसीय संघात निवड करण्यात आली.

Jhulan Goswami (Photo Credit - Twitter)

भारताची अनुभवी महिला गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर झुलन गोस्वामी पुढील महिन्यात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसणार आहे आणि त्यासाठी तिने लंडनमधील लॉर्ड्सचे ऐतिहासिक स्टेडियम निवडले आहे. झुलन गोस्वामी 24 सप्टेंबर रोजी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जाणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी झुलनची शुक्रवारी एकदिवसीय संघात निवड करण्यात आली.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)