Jaydev Unadkat चे 2010 नंतर कसोटी संघात पुनरागमन, Mohammed Shami च्या जागी समावेश

दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी उनाडकटचा समावेश करण्यात आला आहे. तो 12 वर्षांनंतर कसोटी संघात आला आहे. उनाडकटने 2010 मध्ये एकमेव कसोटी खेळली होती.

जयदेव उनाडकट (Photo Credit: IANS)

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटची (Jaydev Unadkat) भारतीय संघात निवड झाली आहे. दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) जागी उनाडकटचा समावेश करण्यात आला आहे. तो 12 वर्षांनंतर कसोटी संघात आला आहे. उनाडकटने 2010 मध्ये एकमेव कसोटी खेळली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. उनाडकट सध्या व्हिसाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी राजकोटमध्ये आहे. येत्या काही दिवसांत तो चितगाव येथील कसोटी संघात सामील होण्याची शक्यता आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement