Jasprit Bumrah Clean Bowled Sam Konstas: जसप्रीत बुमराहने कॉन्स्टासकडून घेतला बदला, क्लीन बोल्ड झाल्यावर केलं अस खास सेलिब्रेशन; पाहा व्हिडिओ
यानंतर बुमराहने खास सेलिब्रेशन केले. त्यांनी कॉन्स्टासचीही खिल्ली उडवली.
Australian Men's Cricket Team vs India National Cricket Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना (IND vs AUS 4th Test 2024) मेलबर्नमध्ये सुरू आहे. या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 474 धावा केल्या. प्रत्युत्तरात चौथ्या दिवशी भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला आणि दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 105 धावांची आघाडी घेतली. मात्र, संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि 20 धावांवर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. ऑस्ट्रेलियाचा शोध मानला जाणारा सॅम कॉन्स्टास (Sam Konstas) दुसऱ्या डावात सपशेल अपयशी ठरला आणि आठ धावा करून जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) बळी ठरला. यानंतर बुमराहने खास सेलिब्रेशन केले. त्यांनी कॉन्स्टासचीही खिल्ली उडवली. एवढेच नाही तर बुमराहने जे सांगितले ते करून दाखवले.
जसप्रीत बुमराहने कॉन्स्टासकडून घेतला बदला
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)