IND vs IRE 2nd T20 Live Update: दुसऱ्या टी-20 मध्ये आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा प्लेइंग 11
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार जिंकला होता आणि आता दुसरा सामनाही जिंकून टीम इंडियाला मालिका आपल्या नावावर करायची आहे. त्याचबरोबर हा सामना जिंकून मालिकेत कायम राहण्याचा आयर्लंडचा प्रयत्न असेल.
भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना डब्लिन येथे होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार जिंकला होता आणि आता दुसरा सामनाही जिंकून टीम इंडियाला मालिका आपल्या नावावर करायची आहे. त्याचबरोबर हा सामना जिंकून मालिकेत कायम राहण्याचा आयर्लंडचा प्रयत्न असेल. आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
आयर्लंड: अँड्र्यू बालबर्नी, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्पर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.
भारत: यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवी बिश्नोई.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)