RR vs LSG Live Streaming Online: आयपीएलमधील दोन आघाडीच्या संघांमध्ये होणार आज रोमांचक सामना, इथे थेट पाहा लाईव्ह सामना
या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व संजू सॅमसन करत आहे तर लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व केएल राहुल करत आहे. या सामन्यात जिथे राजस्थान रॉयल्स संघाला आपली विजयी घोडदौड कायम ठेवायची आहे, तिथे लखनौ संघाला पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर पुनरागमन करायचे आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये दररोज अनेक रोमांचक सामने खेळले जात आहेत. या भागात बुधवारी लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (LSG vs RR) यांच्यात सामना होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना होणार आहे. सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व संजू सॅमसन करत आहे तर लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व केएल राहुल करत आहे. या सामन्यात जिथे राजस्थान रॉयल्स संघाला आपली विजयी घोडदौड कायम ठेवायची आहे, तिथे लखनौ संघाला पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर पुनरागमन करायचे आहे. राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)