IPL 2022, SRH vs CSK Match 46: सनरायझर्सचा डाव फसला; ऋतूराज गायकवाड- डेव्हन कॉन्वेच्या तोफखान्यासमोर हैदराबादच्या गोलंदाजांची शरणागती, चेन्नईने केल्या 202 धावा
IPL 2022, SRH vs CSK Match 46: पुणेच्या MCA येथे नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) निर्णय त्यांच्याच अंगी उलटला. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेव्हन कॉन्वे (Devon Conway) ही चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) सलामी जोडीने हैदराबादच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. चेन्नईने निर्धारित 20 षटकांत दोन विकेट गमावून 202 धावा केल्या आहेत. ऋतुराजने सर्वाधिक 99 धावांची तुंफानी खेळी केली. तर कॉन्वे 85 धावांची फटकेबाजी करून नाबाद परतला. दुसरीकडे, हैदराबादचे गोलंदाज अक्षरशः हतबल दिसले. टी नटराजनने (T Natarajan) सर्व दोन विकेट घेतल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)