IPL 2022: हैदराबादच्या वेगाचा बेताज बादशाह Umran Malik याच्या अभूतपूर्व कामगिरीवर काँग्रेस नेते शशी थरूर यांचे रोखठोक मत, म्हणाले - ‘इंग्लंडला घेऊन जा...’

हैदराबाद आणि पंजाब यांच्यातील आयपीएलच्या 28व्या मॅचमध्ये सनरायझर्सचा गोलंदाज उमरान मलिकने आपल्या झंझावाती गोलंदाजीने सर्वांना चकित केले. उमरान 20व्या षटकातील दुसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट्स घेत प्रकाश झोतात आला. उमरानच्या शानदार गोलंदाजीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी कौतुक केले.

शशी थरूर यांनी उमरान मलिकचे केले कौतुक (Photo Credit: Twitter)

हैदराबाद आणि पंजाब यांच्यातील आयपीएलच्या (IPL) 28व्या मॅचमध्ये सनरायझर्सचा गोलंदाज उमरान मलिकने (Umran Malik) आपल्या झंझावाती गोलंदाजीने सर्वांना चकित केले. उमरान 20व्या षटकातील दुसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट्स घेत प्रकाश झोतात आला. उमरानच्या शानदार गोलंदाजीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी कौतुक केले. थरूर ट्विट करून म्हटले की, “आम्हाला त्याच्या भारतीय संघात समावेश करण्याची गरज आहे. किती अद्भुत प्रतिभा आहे. त्याच्या प्रतिभेचा वेळीच फायदा घ्या. त्याला कसोटी सामन्यातील हिरव्या खेळपट्टीवर गोलंदाजी करण्यासाठी इंग्लंडला घेऊन जा. त्याने आणि बुमराहने एकत्र गोलंदाजी केली तर ब्रिटिश घाबरतील.”

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement