IPL 2022, RR vs GT Qualifier 1: जोस बटलरची ताबडतोड फलंदाजी, राजस्थानचे गुजरातसमोर 189 रन्सचे भव्य टार्गेट

बटलरने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली. तर संजू सॅमसनने 47 धावा आणि देवदत्त पदिक्काल 28 धावांचे योगदान दिले.

जोस बटलर (Photo Credit: PTI)

IPL 2022, GT vs RR Qualifier 1: आयपीएल (IPL) 2022 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात जोस बटलरच्या (Jos Buttler) संयमी फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 बाद 188 धावा केल्या आणि गुजरात टायटन्सपुढे 189 रन्सचे टार्गेट ठेवले आहे. बटलरच्या बॅटवर गुजरातच्या गोलंदाजांनी लगाम लावली होती, पण डेथ ओव्हर्समध्ये या रॉयल फलंदाजाने मुक्तपणे फलंदाजी करत गोलंदाजांचा समाचार घेतला. बटलरने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली. गुजरातकडून मोहम्मद शमी, यश दयाल, साई किशोर आणि हार्दिक पांड्याने 1-1 विकेट घेतली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)