IPL 2022: आयपीएलमध्ये Lasith Malinga याचे पुनरागमन, मुंबई इंडियन्सची साथ सोडून राजस्थान रॉयल्स संघात नवी भूमिका घेतली हाती

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्सने श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याला फ्रँचायझीचा वेगवान गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाच्या खेळाडूंपैकी असलेला मलिंगा गेल्या वर्षी खेळातून निवृत्त झाला. मलिंगा सध्या आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज असून त्याच्या नावावर 122 सामन्यांमध्ये 170 विकेट्स आहेत.

Lasith Malinga (Photo Credits: IANS)

Lasith Malinga Joins Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 पूर्वी फ्रँचायझीचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून श्रीलंकन दिग्गज लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याच्या नावाची घोषणा केली. मलिंगाने यापूर्वी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून काम केले होते. महान वेगवान गोलंदाज त्याच्या अपारंपरिक दृष्टिकोन आणि त्याच्या धोरणात्मक विचारांसाठी प्रसिद्ध आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now