IPL 2022: लखनऊ सुपर जायंट्सचे CEO रघु अय्यर यांच्या मुंबईहून पुणे प्रवासादरम्यान कारचा अपघात, एकूण 3 जण जखमी

पंजाब किंग्ज विरुद्ध आयपीएल 2022 चा 42 वा सामना खेळण्यासाठी जात असताना लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यासोबत एका रस्त्यात अपघात झाला आहे. लखनौच्या टीम बससोबत जाणाऱ्या टीम अधिकाऱ्यांच्या कारचा अपघात झाला. गाडीत लखनौ टीमचे CEO रघु अय्यर, गौतम गंभीरचे पर्सनल सेक्रेटरी आणि आणखी एक सदस्य होते. आणि तिघेही जखमी झाल्याची माहिती आहे.

Lucknow Super Giants Logo (Photo Credit - Twitter)

IPL 2022: लखनौ सुपर जायंट्सचे (Lucknow Super Giants) सीईओ रघु अय्यर (Raghu Iyer) यांसह एकूण 3 जण शुक्रवारी, 29 एप्रिल रोजी लखनौ संघाच्या पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध आयपीएल 2022 च्या सामन्यापूर्वी मुंबई ते पुणे (Pune) प्रवास करताना मोठा अपघात झाला. रघु अय्यर आणि गौतम गंभीरचा मॅनेजर आणि आणखी एक व्यक्ती एका कारमधून पुण्याला प्रवास करत होते, जेव्हा त्यांचा रस्त्यात अपघात झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now