IPL 2022, MI vs DC: दिल्लीचे मुंबईसमोर 160 धावांचे आव्हान, पंत-पॉवेलने राखली लाज; जसप्रीत बुमराहला सर्वाधिक विकेट्स

दिल्लीकडून रोवमन पॉवेलने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर कर्णधार ऋषभ पंतने 39धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, मुंबईसाठी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

ऋषभ पंत (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs DC Match 69: दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) पहिले फलंदाजी करून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 बाद 159 धावा केल्या आणि मुंबई इंडियन्सपुढे (Mumbai Indians) विजयासाठी 160 धावांचे आव्हान ठेवले आहे. प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दिल्लीला आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. दिल्लीकडून रोवमन पॉवेलने (Rovman Powell) सर्वाधिक 43 धावा केल्या. तर कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) 39 आणि पृथ्वी शॉने 24 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, तीन विकेट्स घेत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) मुंबईचा यशस्वी गोलंदाज ठरला. रमणदीप सिंहने 2, डॅनियल सॅम्स आणि मयंक मार्कंडेने प्रत्येकी 1-1 गडी बाद केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)