IPL 2022, KKR vs PBKS Match 8: पंजाबच्या फलंदाजांची हाराकिरी; कोलकातासमोर विजयासाठी अवघे 138 धावांचे आव्हान, उमेश यादव याच्या विकेटांचा ‘चौकार’

पंजाबच्या धुरंधर फलंदाजांनी केकेआरच्या भेदक गोलंदाजीपुढे हाराकिरी पत्करली. उमेश यादव याने चमकदार कामगिरी बजावली. यादवने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

कोलकाता विरुद्ध पंजाब (Photo Credit: PTI)

IPL 2022, KKR vs PBKS Match 8: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 8व्या सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) प्रथम फलंदाजी करून षटकांत 10 विकेट गमावून 137 धावांपर्यंत मजल मारली आणि कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) विजयासाठी 138 धावांचे आव्हान दिले. पंजाबच्या धुरंधर फलंदाजांनी केकेआरच्या (KKR) भेदक गोलंदाजीपुढे हाराकिरी पत्करली, तर अंतिम षटकांत कगिसो रबाडा (Kagiso Rabada) याच्या 25 धावांनी आणि भानुका राजपक्षे याच्या सुरुवातीला 35 धावांनी संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. दुसरीकडे, उमेश यादव (Umesh Yadav) याने चमकदार कामगिरी बजावली. यादवने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर टिम साउदीने 2 गडी बाद केले. तसेच शिवम मावी, आंद्रे रसेल आणि सुनील नारायण यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.