IPL 2022, GT vs PBKS Match 16: शिखर धवन बनला एक हजारी मनसबदार; विराट, रोहितलाही जमली नाही अशी करामात करणारा बनला पहिला भारतीय

IPL 2022, GT vs PBKS Match 16: पंजाब किंग्जकडून खेळणारा स्टार सलामीवीर शिखर धवन याने टी-20 क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी केली आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात धवनने तिसरा चौकार मारताच खास विक्रम आपल्या नावे केला. टी-20 मध्ये 1000 चौकार मारणारा धवन पहिला भारतीय आणि एकूण चौथा फलंदाज ठरला आहे.

शिखर धवन (Photo Credit: PTI)

IPL 2022, GT vs PBKS Match 16: पंजाब किंग्जकडून (Punjab Kings) खेळणारा स्टार सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याने टी-20 क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी केली आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) सुरु असलेल्या सामन्यात धवन टी-20 मध्ये 1000 चौकार (Most Fours in T20) मारणारा पहिला भारतीय आणि एकूण चौथा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी ख्रिस गेल, एलेक्स हेल्स, दावोड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी हा विक्रमी पल्ला गाठला आहे. या सामन्यापूर्वी धवनने 306 टी-20 सामन्यांमध्ये 997 चौकार मारले होते. या बाबतीत तो विद्यमान भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यापेक्षा खूप पुढे आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now