IPL 2022, DC vs SRH: डेविड वॉर्नरचे धुव्वाधार अर्धशतक, पॉवेलच्या फटकेबाजीपुढे सनरायझर्सचे गोलंदाज हतबल, दिल्लीने ठेवले 208 धावांचे टार्गेट; Umran Malik ची झाली धुलाई
वॉर्नरने 92 धावांची खेळी केली तर रोवमान पॉवेलने 35 चेंडूत 67 रन्स केले. हैदराबादचा स्टार वेगवान गोलंदाज उमरान मलिक आपल्या चार षटकांत चांगलाच महागात पडला.
IPL 2022, DC vs SRH Match 50: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने आपला स्टायलिश सलामीवीर डेविड वॉर्नरच्या (David Warner) धुव्वाधार फलंदाजीच्या जोरावर निर्धारित 20 षटकांत तीन बाद 207 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे हैदराबादला विजयासाठी 208 धावांचे टार्गेट मिळाले आहे. वॉर्नरने 92 धावांची खेळी केली तर रोवमान पॉवेलने (Rovman Powell) 35 चेंडूत 67 रन्स केले. याशिवाय कर्णधार ऋषभ पंतने 26 धावांचे छोटेखानी योगदान दिले. दुसरीकडे, वॉर्नर आणि पॉवेलच्या तुफानी खेळीपुढे सनरायझर्सचे धाकड गोलंदाज अक्षरशः फिके पडले. लक्षणीय आहे की हैदराबादचा स्टार वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) आपल्या चार षटकांत चांगलाच महागात पडला. मलिकने ओव्हरमध्ये एकही विकेट न घेतला 52 धावा लुटल्या. सीन एबोट, भुवनेश्वर कुमार आणि श्रेयस गोपाल यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)