IPL 2022, DC vs RR: राजस्थानविरुद्ध सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सची चिंता वाढली, कोरोनामुळे आता कोच Ricky Ponting मैदानातून राहणार दूर

IPL 2022, DC vs RRL आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्स पूर्णपणे कोरोनाच्या विळख्यात सापडली असल्याचे दिसत आहे. पथकात एकापाठोपाठ एक पॉझिटिव्ह प्रकरणे समोर येत आहेत. आता मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगच्या कुटुंबातील एक सदस्य कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यामुळे, शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पाँटिंग डगआउटमध्ये दिसणार नसून ते पाँटिंग पाच दिवस आयसोलेशनमध्ये राहतील.

रिकी पॉन्टिंग (Photo Credit: Twitter)

IPL 2022, DC vs RR Match 34: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) आणखी वाईट बातमी समोर आली आहे. मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) रॉयल्सविरुद्ध सामन्यासाठी डगआऊटमध्ये उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर पाँटिंग सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. तथापि, पाँटिंगची दोनदा चाचणी निगेटिव्ह आली आहे परंतु ते त्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात आल्याने त्याला क्वारंटाईन ठेवण्यात आले आहेत. पॉन्टिंग आता पाच दिवस आयसोलेशनमध्ये राहतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement