IPL 2022, DC vs RCB Match 27: दिनेश कार्तिकने केला कहर, बेंगलोरचे दिल्लीसमोर 190 धावांचे तगडे आव्हान

IPL 2022, DC vs RCB: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएलच्या 27 व्या सामन्यात दिनेश कार्तिक याच्या झंझावती अर्धशतकी खेळीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला निर्धारित षटकांत पाच बाद धावांपर्यंत मजल मारून दिली. अशाप्रकारे वानखेडे स्टेडियमवर दिल्लीला विजयासाठी धावांचे तगडे आव्हान मिळाले आहे. कार्तिकने नाबाद 66 धावांची तुफानी खेळी केली. तर शाहबाद अहमद 32 धावा करून नाबाद परतला.

दिनेश कार्तिक (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs RCB: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धच्या आयपीएलच्या (IPLP) 27 व्या सामन्यात दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्या झंझावती अर्धशतकी खेळीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाला निर्धारित 20 षटकांत पाच बाद 189 धावांपर्यंत मजल मारून दिली. अशाप्रकारे वानखेडे स्टेडियमवर दिल्लीला विजयासाठी 190 धावांचे तगडे आव्हान मिळाले आहे. कार्तिकने नाबाद 66 धावांची तुफानी खेळी केली. तर ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) 55 धावा केल्या आणि शाहबाद अहमद 32 धावा करून नाबाद परतला. कार्तिकने आपल्या खेळीत 5 चौकार आणि तितकेच षटकार खेचले. दुसरीकडे, दिल्लीकडून शार्दूल ठाकूर, खालील अहमद, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement