IPL 2022, DC vs RCB Match 27: वानिंदू हसरंगाच्या फिरकीने केली कमाल, अर्धशतक करून डेविड वॉर्नरने धरली पॅव्हिलियनची वाट

हसरंगाच्या फिरकीत अडकून वॉर्नरने 38 चेंडूत 66 धावांत पॅव्हिलियनची वाट धरली. ऑस्ट्रेलियन सलामीवीरने आपल्या खेळीत चार चौकार आणि 5 मोठे षटकार खेचले.

वानिंदू हसरंगा (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, DC vs RCB Match 27: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आणि दिल्ली कॅपिटल्सचा धाकड सलामीवीर डेविड वॉर्नरला (David Warner) पायचीत पकडलं. हसरंगाच्या फिरकीत अडकून वॉर्नरने 38 चेंडूत 66 धावांत पॅव्हिलियनची वाट धरली. ऑस्ट्रेलियन सलामीवीरने आपल्या खेळीत चार चौकार आणि 5 मोठे षटकार खेचले. यासह दिल्लीने 94 धावसंख्येवर दुसरी विकेट गमावली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)