IPL 2022, DC vs KKR Match 41: दिल्लीची कसून गोलंदाजी; नितीश राणाचे अर्धशतक, श्रेयस अय्यरच्या 43 धावांनी तारलं, कोलकाताची 146 धावांपर्यंत मजल

IPL 2022, DC vs KKR Match 41: नितीश राणाचे अर्धशतक आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या 43 धावांनी कोलकाता नाईट रायडर्सला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 146 धावांपर्यंत मजल मारली आहे. अशाप्रकारे दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 147 धावांचे आव्हान मिळाले. नितीशने केकेआरसाठी सर्वाधिक 57 धावा केल्या. दुसरीकडे, कुलदीप यादवने केकेआर च्या फलंदाजांना आपल्या फिरकीपुढे गुडघे टेकण्यास भाग पाडले.

नितीश राणा (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs KKR Match 41: नितीश राणाचे (Nitish Rana) अर्धशतक आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) 43 धावांनी कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) निर्धारित 20 षटकांत 9 बाद 146 धावांपर्यंत मजल मारली आहे. अशाप्रकारे दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) विजयासाठी 147 धावांचे आव्हान मिळाले आहे. नितीशने केकेआरसाठी सर्वाधिक 57 धावा केल्या. तर रिंकू सिंह 23 धावा करून परतला. दुसरीकडे, कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) कोलकात्याच्या फलंदाजांना आपल्या फिरकीपुढे गुडघे टेकण्यास भाग पाडले. कुलदीपने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तसेच मुस्तफिजूर रहमानने तीन, चेतन साकरिया, आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement