IPL 2022, CSK vs RR: चेन्नई सुपर किंग्जचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय; दुबेच्या जागी रायुडूचा प्लेइंग XI मध्ये समावेश

मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवरील सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने शिवम दुबेच्या जागी अंबाती रायुडूचा समावेश केला आहे तर, रॉयल्सच्या ताफ्यात शिमरॉन हेटमायर परतला आहे.

एमएस धोनी, संजू सॅमसन (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs RR: आयपीएलचा (IPL) 68 वा सामना आज संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात होणार आहे. या सामन्यात रॉयल्सची नजर प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यावर असेल, तर सीएसके आपली लाज राखण्यासाठी मैदानात उतरेल. मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवरील सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानच्या ताफ्यात शिमरॉन हेटमायरचे पुनरागमन झाले आहे. तर, चेन्नई कोणतेही बदल न करता मैदानात उतरणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)