IPL 2022, CSK vs MI: ‘तो लवकरच भारताचा सर्व फॉरमॅटचा खेळाडू बनणार’; ‘या’ मॅच-विनिंग फलंदाजासाठी कॅप्टन रोहित शर्माने कौतुकाचे पूल बांधले!

रोहित शर्मा म्हणाला की, मुंबई इंडियन्सचा 19 वर्षीय फलंदाज तिलक वर्मा याचे भविष्य उज्ज्वल आहे आणि तो लवकरच भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळू शकेल. तिलकने सर्वाधिक नाबाद 34 धावा केल्या आणि चेन्नई सुपर किंग्जचा 5 विकेट्सने पराभव केला. एका टप्प्यावर मुंबई इंडियन्सची 4 बाद 33 अशी अवस्था होती पण तिलक आणि ऋतिक शोकीन यांनी 5व्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेले.

तिलक वर्मा (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs MI: रोहित शर्माने (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) युवा खेळाडू तिलक वर्माचे (Tilak Varma) कौतुक केले आणि तो लवकरच भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळणार असल्याचे म्हटले. एका टप्प्यावर मुंबईची 4 बाद 33 अशी अवस्था होती पण 19 वर्षीय तिलक आणि ऋतिक शोकीन यांनी 5व्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेले. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक 34 धावांची मॅच-विनिंग खेळी केली, ज्याचे कर्णधार रोहित शर्माने भरभरून कौतुक केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now