IPL 2022, CSK vs GT: गुजरातची कसून गोलंदाजी; चेन्नई सुपर किंग्सला 133/5 धावांत रोखले, Ruturaj Gaikwad ने ठोकले जोरदार अर्धशतक

अशाप्रकारे गुजरातला विजयासाठी 134 धावांचे माफक लक्ष्य मिळाले आहे. चेन्नईसाठी ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 53 धावा केल्या. तर एन जगदीशन 39 धावा करून नाबाद राहिला. तसेच गुजरातकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.

ऋतुराज गायकवाड (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs GT Match 62: गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने शानदार गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) 5 बाद 133 धावांवर रोखले आहे. अशाप्रकारे गुजरातला विजयासाठी 134 धावांचे माफक लक्ष्य मिळाले आहे. चेन्नईसाठी ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) सर्वाधिक 53 धावा केल्या. तर एन जगदीशन (N Jagadeesan) 39 धावा करून नाबाद राहिला. तसेच मोईन अलीने 21 धावांचे छोटेखानी योगदान दिले. दुसरीकडे, गुजरातकडून मोहम्मद शमीने (Mohammed Shami) सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. राशिद खान, अल्झारी जोसेफ आणि आर साई किशोरने प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)