IPL 2022, CSK vs DC: चेन्नई सुपर किंग्जचा 208 धावांचा डोंगर, Devon Conway ची वादळी खेळी, Dhoni चा ‘फिनिशिंग टच’; दिल्ली गोलंदाजांची उडवली दाणादाण

IPL 2022, CSK vs DC: चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 55 व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करून निर्धारित 20 षटकांत पाच बाद 208 धावांचा डोंगर उभारला आहे. आणि दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सीएसकेसाठी डेव्हॉन कॉन्वेने सर्वाधिक 87 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर कर्णधार एमएस धोनी 8 चेंडूत 21 धावा करून नाबाद परतला.

डेव्हॉन कॉन्वे (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs DC: चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) आयपीएलच्या (IPL) 55 व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करून निर्धारित 20 षटकांत पाच बाद 208 धावांचा डोंगर उभारला आहे. आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) समोर विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सीएसकेसाठी डेव्हॉन कॉन्वेने (Devon Conway) सर्वाधिक 87 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने 41 आणि शिवम दुबेने 32 धावांचे छोटेखानी योगदान दिले. तसेच कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) 8 चेंडूत 21 धावा करून नाबाद परतला. धोनीने मोक्याच्या क्षणी काही मोठे फटके खेळून संघाला दोनशे पार मजल मारून दिली. दुसरीकडे, चेन्नईच्या तुफान फलंदाजीपुढे दिल्लीचे गोलंदाज अक्षरशः हतबल दिसले. एनरिच नॉर्टजेने (Anrich Nortje) सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर, खालील अहमदने दोन आणि मिचेल मार्शने 1 गडी बाद केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now