IPL 2022, CSK vs DC: ऋषभ पंतने जिंकला टॉस, दिल्लीचे चेन्नईला पहिले फलंदाजीचे आमंत्रण; Ravindra Jadeja या कारणामुळे बाहेर बसणार
DY पाटील स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकून सीएसकेला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले.
IPL 2022, CSK vs DC: आयपीएल 2022 चा 55 वा सामना गुरु-शिष्य यांच्यात म्हणजेच एमएस धोनीचे चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघांत खेळला जाणार आहे. DY पाटील स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) टॉस जिंकून सीएसकेला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. दिल्लीच्या ताफ्यात दोन बदल करण्यात आले असून धोनी ब्रिगेडमध्ये दुखापतग्रस्त रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) जागी शिवम दुबेचा समावेश करण्यात आला आहे. जडेजाला गेल्या सामन्यात फिल्डिंग करताना दुखापत झाली होती, ज्यामुळे तो आजच्या सामन्यातून बाहेर बसणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)