IPL 2021: MS Dhoni याची ‘येलो आर्मी’ चेन्नईहून मुंबईकडे रवाना, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वानखेडे येथे होणार CSK ची भिडत

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी चेन्नईहुन मुंबईसाठी रवाना झाला आहे. आयपीएल 2021 मधील चेन्नई सुपर किंग्ज आपल्या सलामीच्या सामन्यात 10 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सचा सामना करेल. दोन्ही संघांमधील हा रोमांचक सामना सायंकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.

महेंद्र सिंह धोनी (Photo Credits: Instagram)

चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) चेन्नईहुन मुंबईसाठी (Mumbai) रवाना झाला आहे. आयपीएल (IPL) 2021 मधील चेन्नई सुपर किंग्ज आपल्या सलामीच्या सामन्यात 10 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सामना करेल. दोन्ही संघांमधील हा रोमांचक सामना सायंकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. दरम्यान, संघ आगामी आयपीएलमध्ये नवीन जर्सी परिधान केलेली दिसेल. चेन्नईच्या नवीन जर्सीमध्ये भारताच्या सशस्त्र दलाचा (Armed Force) सन्मान म्हणून ‘कॅमोफ्लॉज’ देखील आहे. शिवाय फ्रँचायझीच्या ‘लोगो’च्या वरती तीन स्टार आहेत जे 2010, 2011 आणि 2018 मध्ये आयपीएलचा खिताब जिंकल्याचं दर्शवतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now