IND vs BAN 1st Test Day 1 Live Update: भारताची चौथी विकेट, ऋषभ पंत 45 चेंडूत 46 धावा करून बाद

आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. फलंदाजी करताना भारताची चोथी विकेट पडली आहे.

रिषभ पंत (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN 1st Test) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. फलंदाजी करताना भारताची चोथी विकेट पडली आहे. 32 व्या षटकात मेहदी हसनने प्रथम पंतला षटकार मारला आणि नंतर त्याला बोल्ड केले. पंतही राहुलच्या शैलीत बाद झाला. थोडा ऑफ खेळण्याचा प्रयत्न केला असता चेंडू बॅटच्या काठावर जाऊन स्टंपला लागला. पंतने 45 चेंडूत 46 धावा केल्या. त्याच्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement