IND-W vs SA-W T20 Tri-Series Final: तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिकेचा पाच गडी राखुन दणदणीत विजय

टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 109 धावा केल्या.

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज T20 तिरंगी मालिकेचा अंतिम सामना खेळवला गेला. या अंतिम सामन्यात भारताला पराभवाला समोरो जावे लागले. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 109 धावा केल्या. टीम इंडियाकडून हरलीन देओलने सर्वाधिक 46 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको म्लाबाने दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 110 धावा करायच्या होत्या पण लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने पाच गडी राखून हा अंतिम सामना जिंकला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement