IND W vs Nz W T20 World Cup 2024 Live Score Update: भारतीय संघाचे पुनरागमन, न्यूझीलंडला दुहेरी धक्का

टीम इंडियासोबतच न्यूझीलंडचाही हा स्पर्धेतील पहिला सामना आहे. दरम्यान, न्युझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Team India | Twitter

India Women's National Cricket Team vs New Zealand Women's National Cricket Team: महिला टी-20 विश्वचषक 2024 ला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. आज भारतीय महिला संघाचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. (India Women's National Cricket Team vs New Zealand Women's National Cricket Team) हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला टी-20 विश्वचषकाची सुरुवात विजयाने करायची आहे. तर न्यूझीलंड संघाचे नेतृत्व सोफी डिव्हाईन करत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना हा या स्पर्धेतील चौथा सामना आहे. टीम इंडियासोबतच न्यूझीलंडचाही हा स्पर्धेतील पहिला सामना आहे. दरम्यान, न्युझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड महिला संघाला दुसरा धक्का लागला आहे. न्यूझीलंड महिला संघाचा स्कोर 68/2