India Beat Netherlands: भारतीय संघाने दिवाळीत दिली विजयाची भेट, गटातील शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सचा 160 धावांनी केला पराभव
टीम इंडिया आणि नेदरलँड्स यांच्यातील हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला आणि साखळी सामन्यांमध्ये अपराजित राहिली.
दिवाळीच्या मुहूर्तावर टीम इंडियाचा सामना आज बंगळुरूमध्ये नेदरलँडशी (IND vs NED) झाला. टीम इंडिया आणि नेदरलँड्स यांच्यातील हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला आणि साखळी सामन्यांमध्ये अपराजित राहिली. याआधी टीम इंडियाच्या रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत चार गडी गमावून 410 धावा केल्या. टीम इंडियासाठी स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी करत नाबाद 128 धावा केल्या. नेदरलँड्सकडून बास डी लीडेने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला नेदरलँडचा संपूर्ण संघ 47.5 षटकांत केवळ 250 धावा करून अपयशी ठरला. नेदरलँड्सकडून तेजा निदामनुरूने सर्वाधिक नाबाद 54 धावा केल्या. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. टीम इंडिया आता 15 नोव्हेंबरला उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी भिडणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)