Indian Deaf Cricket Team Warm Welcome: भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघाचे चेन्नई विमानतळावर जल्लोषात स्वागत (Watch Video)

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघाने 18 जून ते 27 जून 2024 दरम्यान इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या द्विपक्षीय T-20 सामन्यांच्या मालिकेत यजमान संघाचा 5-2 असा पराभव करून इतिहास रचला.

Indian Deaf Cricket Team Warm Welcome (PC - X/@PTI_News)

Indian Deaf Cricket Team Warm Welcome: या आठवड्याच्या सुरुवातीला यजमान इंग्लंडला सात सामन्यांच्या T20 मालिकेत 5-2 ने पराभूत करून मायदेशी परतलेल्या भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघाचे चेन्नई विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघाने 18 जून ते 27 जून 2024 दरम्यान इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या द्विपक्षीय T-20 सामन्यांच्या मालिकेत यजमान संघाचा 5-2 असा पराभव करून इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयाबद्दल, भारतीय कर्णबधिर संघाच्या सर्व सदस्यांचे गुरुवारी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते अभिनंदन व सन्मान करण्यात आला. (हेही वाचा - Rohit Sharma Special Welcome By Childhood Friends: टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माचं बालपणीच्या मित्रांनी केलं खास स्वागत (Watch Video))

पहा व्हिडिओ -

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)