IND vs NZ 1st Test Live Streaming: बंगळुरूमध्ये भारत देणार न्यूझीलंडला खडतर आव्हान, पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात; 'इंथ' पाहा लाइव्ह
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना आजपासून बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. यापूर्वी भारताने बांगलादेशचा 2-0 असा पराभव केला होता. न्यूझीलंड संघाने भारतात दीर्घकाळ एकही कसोटी सामना जिंकलेला नाही.
India National Criket Team vs New Zeland National Cricket Team: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज, बुधवार, 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे, जी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या अंतर्गत खेळवली जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना आजपासून बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. यापूर्वी भारताने बांगलादेशचा 2-0 असा पराभव केला होता. न्यूझीलंड संघाने भारतात दीर्घकाळ एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सामना सुरू होईल. नाणेफेक सकाळी 9 वाजता होईल. दरम्यान, Sports18 नेटवर्कच्या विविध चॅनेलवर टीव्हीवर कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण पाहू शकता तसेच तुम्ही या सामन्यांचे थेट प्रवाह अगदी मोफत Jio Cinema ॲपवर पाहू शकता.