India Beat West Indies: भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून मिळवला विजय, मालिकेत 1-0 अशी घेतली आघाडी
तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
IND vs WI 1st ODI 2023: टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज बार्बाडोस येथे खेळला गेला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 23 षटकांत केवळ 114 धावांवर गारद झाला. वेस्ट इंडिजकडून कर्णधार शाई होपने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 22.5 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी सलामीवीर इशान किशनने सर्वाधिक 52 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोतीने सर्वाधिक दोन बळी घेतले. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वनडे सामना शनिवारी म्हणजेच 29 जुलै रोजी बार्बाडोसमध्ये खेळवला जाणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)