Sachin Tendulkar Trolls Shoaib Akhtar: भारताने विश्वचषकात पाकिस्तानचा 8व्यांदा केला पराभव, विजयानंतर सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरला केले ट्रोल; पाहा ट्विट
रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर 192 धावांचे आव्हान 30.3 षटकात 7 विकेट राखून सहज पार केले. भारताकडून रोहित शर्माने 86 धावांची खेळी केली.
अहमदाबाद येथील हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेटने (IND Beat PAK) सहज पराभव केला. आधी गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानला 191 धावांत रोखले. त्यानंतर रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर 192 धावांचे आव्हान 30.3 षटकात 7 विकेट राखून सहज पार केले. भारताकडून रोहित शर्माने 86 धावांची खेळी केली. त्याशिवाय श्रेयस अय्यर यानेही संयमी अर्धशतक ठोकले. या विजयानंतर भारताचा महान माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला ट्रोल केले आहे. पण यांची सुरुवातही शोएब अख्तरनेच केली होती ज्यामुळे सचिन तेंडुलकरने ट्वीट करत चोख उत्तर दिले.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)