IND vs WI 1st Test: रवी अश्विन ठरला कसोटीत पिता-पुत्राची विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज; भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात Tagenarine Chanderpaul ला केले बाद
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीत अश्विनने भारतीय संघाला प्रथम यश मिळवून दिले.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विन (आर अश्विन) याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या पहिल्या सामन्यात एक मोठा विक्रम केला आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीत अश्विनने भारतीय संघाला प्रथम यश मिळवून दिले. अश्विनने वेस्ट इंडिजचा सलामीवीर टेजनरीन चांदरपॉल (Tagenarine Chanderpaul) तेजनारायण चंद्रपॉलला बाद केले. अशाप्रकारे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पिता-पुत्र जोडीला बाद केले आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आणि पाचवा जागतिक गोलंदाज ठरला आहे. याआधी 2011 मध्ये रवी अश्विनने तेजनारायण चंद्रपॉलचे वडील शिवनारायण चंद्रपॉल यांना बाद केले होते. (हेही वाचा: India Historic Victory: इंटरनॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाडमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, 4 विद्यार्थ्यांनी जिंकले प्रथमच सुवर्णपदक)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)