IND vs SL 1st Test Day 3: पथुम निसांकाचे अर्धशतक, टीम इंडिया पाचव्या विकेटच्या शोधात

पथुम निसांका (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SL 1st Test Day 3: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ मोहाली येथे सुरू झाला आहे. श्रीलंकेचा फलंदाज पथुम निसांकाने (Pathum Nissanka) 108 चेंडूत 9 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे सहावे अर्धशतक आहे. भारतीय गोलंदाज दिवसाच्या सुरुवातीला सध्या पाचव्या विकेटच्या शोधात असून संघ ड्रायव्हिंग सीटवर आहे, कारण टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली आणि नंतर 4 श्रीलंकेच्या फलंदाजांना 100 धावांत माघारी धाडलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement