IND vs SA ICC T20 World Cup 2024 Final Live Streaming: आज जगाला मिळणार टी-20 क्रिकेटचा बादशाह, भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना; थोड्याच वेळात येथे पाहू शकता लाइव्ह

तर दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकानं आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे दोन्ही संघानां आज जगज्जेते होण्याची सुवर्णसंधी आहे.

IND vs SA (Photo Credit - X)

IND vs SA ICC T20 World Cup 2024 Final: टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND vs SA T20 World Cup 2024 Final) भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकाशी (IND vs SA) होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे आज म्हणजेच 29 जून रोजी रात्री 8 वाजता खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघाच्या टी-20 वर्ल्ड कपबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडिया 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अंतिम फेरीत पोहोचली आहे. तर दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकानं आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे दोन्ही संघानां आज जगज्जेते होण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, क्रिकेट प्रेमी हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे टीव्हीवर थेट सामन्यांचा आनंद घेऊ शकतात. मोबाइलवर डिस्ने+ हॉटस्टारवरही मॅचचा लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)