IND vs SA 3rd Test: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाउन कसोटीत विराट कोहलीच्या ‘अपरिपक्व’ वागणूकीसाठी गौतम गंभीरने कडक शब्दात केली निंदा
गंभीरने म्हटले की त्याची प्रतिक्रिया अपरिपक्व होती व तो नवोदित क्रिकेटपटूंसाठी एक वाईट उदाहरण मांडत आहे.
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान DRS च्या वादग्रस्त निर्णयाविरुद्ध त्याच्या आक्रोशाबद्दल कसोटी कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) निंदा केली आणि म्हटले की त्याची प्रतिक्रिया अपरिपक्व होती व तो नवोदित क्रिकेटपटूंसाठी एक वाईट उदाहरण मांडत आहे. कोहली, उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन यांनी स्टंप माइकमध्ये पंच व तंत्रज्ञानाबद्दल काही अप्रिय टिप्पण्या केल्या जेव्हा प्रतिस्पर्धी कर्णधार डीन एल्गरला (Dean Elgar) तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या तासात वादग्रस्त DRS निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला. “हे खरोखरच वाईट आहे. कोहलीने जे केले, स्टंप माईकजवळ जाऊन त्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली, ती खरोखरच अपरिपक्व आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय कर्णधाराकडून, भारतीय कर्णधाराकडून अशी अपेक्षा नाही,” गंभीरने स्टार स्पोर्ट्सला सांगितले. (IND vs SA 3rd Test Day 3: थर्ड अंपायरच्या निर्णयाने संतप्त Virat Kohli चे अपशब्द कॅमेऱ्यात कैद, Dean Elgar वर चालवले शब्दांचे बाण Watch Video)
सेंच्युरियनच्या पहिल्या कसोटीत मयंक अग्रवाललाही दिलासा मिळायचे देखील गंभीरने निदर्शनात आणून दिले, परंतु दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराकडून समान प्रतिसाद मिळाला नाही. “तंत्रज्ञान तुमच्या हातात नाही. मग लेग-साइडवर कॅच-बॅक अपील असताना तुम्ही त्याच पद्धतीने प्रतिक्रिया दिली होती, डीन एल्गरनेही तशी प्रतिक्रिया दिली नाही. मयंक अग्रवालच्या त्या अपील दरम्यान ते बाहेर दिसले. उघड्या डोळ्यांनी, परंतु एल्गरने त्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली नाही,” तो म्हणाला. 21व्या षटकात, एल्गरला अश्विनने पायचीत अपील केल्यावर मैदानावरील पंच मारयस इरास्मस यांनी आऊट घोषित केले. मात्र, थर्ड अंपायरच्या रिव्यूनंतर हा निर्णय रद्द करण्यात आला. या निर्णयामुळे नाराज झालेला कोहली स्टंपवर गेला आणि म्हणाला, “तुमच्या संघावरही लक्ष केंद्रित करा जेव्हा ते चेंडूवर चमक दाखवतात तेव्हा विरोधी पक्षावर नाही. नेहमी लोकांना पकडण्याचा प्रयत्न करत असतो.”
दुसरीकडे राहुल आणि अश्विननेही अशाच प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “संपूर्ण देश 11 खेळाडूंविरुद्ध आहे,” केएल राहुल म्हणाला, तर अश्विनने ब्रॉडकास्टरला फटकारले: “तुम्हाला जिंकण्यासाठी अधिक चांगले मार्ग शोधले पाहिजेत, सुपरस्पोर्ट.” गंभीर म्हणाला की, मला विश्वास आहे की मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड गुरुवारी त्याच्या कृत्यांबद्दल कोहलीशी बोलतील. “या कसोटी सामन्यातील निकाल काहीही असो, इतके दिवस संघाचे नेतृत्व करणाऱ्या कसोटी कर्णधाराकडून तुम्हाला ही अपेक्षा नाही. मला आशा आहे की राहुल द्रविडला त्याच्याशी बोलला असेल कारण ज्या प्रकारचा कर्णधार द्रविड होता, त्याने कधीही अशी प्रतिक्रिया दिली नसती.”
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)