IND vs PAK Asia Cup 2022: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर Sharad Pawar यांनी दिली हात उंचावत उत्साही प्रतिक्रिया (Watch Video)

148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने हे लक्ष्य 19.4 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले.

Sharad Pawar (संग्रहित संपादित प्रतिमा)

आज दुबई येथे आशिया चषक 2022 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला गेला. या सामन्याकडे तमाम चाहत्यांचे लक्ष लागून होते. सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. पाकिस्तान संघ 19.5 षटकांत केवळ 147 धावा करू शकला. 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने हे लक्ष्य 19.4 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले. भारताच्या या विजयानंतर अनेक नेते मंडळींच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतेच पीएम नरेंद्र मोदी यांनी संघाचे अभिनंदन केले. यांनतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भारताने सामना जिंकल्यावर शरद पवार यांनी हात उंचावत उत्साही प्रतिक्रिया दिली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement