IND vs NZ 3rd Test 2024 Day 3 Live Score Update: मुंबई कसोटीत भारताचा संघ अडचणीत; टीम इंडियाने 29 धावांवर गमावल्या 5 विकेट
पण एक चुकीचा फटका मारताना तो बाद झाला. त्यांने 11 चेंडूत 11 धावा केल्या. यानंतर फलंदाजीला आलेला विराट कोहली हा देखील एक धाव करुन बाद झाला, यानंतर यशस्वी आणि सरफराज देखील स्वस्तात लागोपाठ बाद झाले. सध्या भारताची धावसंख्या 39 वर 5 अशी असून भारताला विजयासाठी अजूनही 108 धावांची गरज आहे.
Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, 3rd Test Match Day 3 Live Streaming: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series) तिसरा सामना 1 नोव्हेंबरपासून खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड संघाने 59.4 षटकांत नऊ गडी गमावून 171 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 44 धावा करून संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. दुसऱ्या डावात न्यूझीलंड संघाने 143 धावांची आघाडी घेतली होती. आजच्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर रविंद्र जाडेजाने भारताला पहिले यश लवकर मिळवून दिले. भारताला विजयासाठी 147 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या डावाची सुरुवात रोहित शर्माने आक्रमक पद्धतीने सुरु करण्याचा प्रयत्न केला. पण एक चुकीचा फटका मारताना तो बाद झाला. त्यांने 11 चेंडूत 11 धावा केल्या. यानंतर फलंदाजीला आलेला विराट कोहली हा देखील एक धाव करुन बाद झाला, यानंतर यशस्वी आणि सरफराज देखील स्वस्तात लागोपाठ बाद झाले. सध्या भारताची धावसंख्या 39 वर 5 अशी असून भारताला विजयासाठी अजूनही 108 धावांची गरज आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)