IND vs NZ 1st Test Day 5 Live Update: ओल्या मैदानामुळे खेळ सुरू होण्यास उशीर, 9:45 वाजता पंच करणार निरीक्षण
ओल्या मैदानामुळे पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास उशीर होत आहे. सकाळी 9.45 वाजता पंच तपासणीसाठी येतील.
Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team 1st Test Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला (IND vs NZ 1st Test 2024) बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) पार पडत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. आज सामन्याचा शेवटचा दिवस आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर म्हणून न्यूझीलंडचा संघ फलंदाजीसाठी उतरला. पण फक्त 4 चेंडू खेळू शकला. आता भारताला जिंकण्यासाठी 10 विकेट लवकर काढाव्या लागतील. पण हा सामना सध्या न्यूझीलंडच्या बाजूने आहे. दरम्यान, ओल्या मैदानामुळे पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास उशीर होत आहे. सकाळी 9.45 वाजता पंच तपासणीसाठी येतील.
Inspection to take place at 9:45 AM IST.
Scorecard - https://t.co/FS97Llv5uq#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank https://t.co/p5xhkTHHaY
— BCCI (@BCCI) October 20, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 20, 2024 09:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

