IND vs ENG: भारताने इंग्लंडला नमवत मालिकेत घेतली 2-1 आघाडी, रोहित शर्मा बनला सामनावीर पुरस्काराचा मानकरी

भारताने चौथ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला 157 धावांनी पराभूत करत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. ओव्हलमध्ये भारताने 50 वर्षांनंतर विजय मिळवला आहे. भारतासाठी दुसऱ्या डावात शानदार 127 धावांसाठी रोहित शर्मा सामनावीर ठरला. या सामन्यात भारताने विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंड 210 धावांवर ढेर झाला.

रोहित शर्मा परदेशात पहिले टेस्ट शतक (Photo Credit: PTI)

भारताने (India) चौथ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला (England) 157 धावांनी पराभूत केले. ओव्हलमध्ये भारताने 50 वर्षांनंतर विजय मिळवला आहे. भारतासाठी दुसऱ्या डावात शानदार 127 धावांसाठी रोहित शर्माला (Rohit Sharma) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement