IND vs ENG: इंग्लंडला मोठा झटका; Stuart Broad भारताविरुद्ध मालिकेतून बाहेर, ‘या’ क्रिकेटरपटूला मिळू शकते पदार्पणाचे तिकीट!

35 वर्षीय ब्रॉडच्या दुखापतीमुळे इंग्लंडला वेगवान गोलंदाज साकिब महमूदला त्यांच्या कसोटी संघात समाविष्ट करणे भाग पडले. महमूद लॉर्ड्स सामन्यातून कसोटी पदार्पण करू शकतो.

Stuart Broad (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 2021 Series: इंग्लंडचा (England) अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) पोटरीच्या दुखापतीमुळे भारताविरुद्ध (India) उर्वरित कसोटी मालिकेतून वगळण्यात आला आहे, अशी माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने बुधवारी दिली. ब्रॉडच्या दुखापतीमुळे इंग्लंडला वेगवान गोलंदाज साकिब महमूदला (Saqib Mahmood) त्यांच्या कसोटी संघात समाविष्ट करणे भाग पडले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)