IND vs ENG 1st Test Day 1: टीम इंडिया गोलंदाजांचा इंग्लंडला दणका, दुपारच्या जेवणापर्यंत ब्रिटिश टीम 2 बाद 61 धावा

दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत टीम इंडिया गोलंदाजांनी यजमान संघावर दबदबा कायम ठेवला. पहिल्या सत्राखेरीस ब्रिटिश संघाकडून कर्णधार जो रूट 12 धावा व डोम सिब्ली 18 धावा करून खेळत होते.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st Test Day 1: भारताविरुद्ध (India) पहिल्या कसोटी सामन्यात टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत यजमान इंग्लंडने (England) दिवसाच्या पहिल्या सत्रात 25 ओव्हरमध्ये दोन विकेट्स गमावून 61 धावा केल्या आहेत. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत टीम इंडिया (Team India) गोलंदाजांनी यजमान संघावर दबदबा कायम ठेवला. पहिल्या सत्राखेरीस ब्रिटिश संघाकडून कर्णधार जो रूट (Joe Root) 12 धावा व डोम सिब्ली 18 धावा करून खेळत होते. दुसरीकडे, भारतासाठी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक विकेट काढली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)