IND Beat ZIM, 3rd T20I Live Score Update: भारताची झिम्बाब्वेवर मात, डिऑन मेयर्सची अर्धशतकी खेळी व्यर्थ; मालिकेत आघाडी

या विजयासह शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने आघाडी मिळवली आहे.

भारत विरूद्ध झिम्बाब्वेमध्ये आज तिसरा टी-20 सामना खेळवला जात आहे. हरारे स्पोर्ट्स क्लबवर हा सामना खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेवर 23 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने आघाडी मिळवली आहे. भारताने दिलेल्या 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ निर्धारित षटकांत 159 धावाच करू शकला. भारताच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये लागोपाठ घेतलेल्या 3 विकेट्समुळे झिम्बाब्वेचा संघ बॅकफूटवर गेला. झिम्बाब्वेकडून डियॉन मेयर्सने शानदार फटकेबाजी करत 65 धावा केल्या आणि संघाला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली. पण त्याचे हे प्रयत्न संघाला विजय मिळवून देण्यात अपुरे पडले.

पाहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)